परभणी
गंगाखेड श्री संत जनाबाई महाविद्यालयात आमदाराचा हट्टापोटी दुसऱ्यांदा घेण्यात आलेल्या शांतता कमिटीचा बैठकीत आमदार व डिवायएसपी यांची चांगलीच खडाजंगी झाल्याने गणेशोत्सवाची शांतता बैठकीतच अशांतता वारवांर होत आसल्याने शहरात वेगळीच चर्चा रंगत आहे.
गणेशोत्सवानिमित्त शहरांसह व तालुक्यात गणेश उत्सव शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलिस प्रशासन तहसिल प्रशासनाने शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन संत जनाबाई महाविद्यालयात केले होते यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा तहसीलदार गोविंद येरमे, नायब तहसीलदार सुनील कांबळे, महावितरण इंजिनियर नितेश भसारकर नगर परीषद मुख्य अधिकारी वसुधा फड सुरेश मणियार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक ईजळकर देवकर,डि.बी.चे देशपांडे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडुशेट सोमाणी,पत्रकार रमेश कातकडे, पत्रकार भागवत जलाले, पत्रकार बालासाहेब जंगले, गंगाखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मोसीन खान, पत्रकार महमूद शेख, शेख खाजाभाई, समाजवादी
पार्टीचे तालुकाध्यक्ष शेख उस्मान भाई,
उपस्थित होते.उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी मार्गदर्शक सुचना केल्या तर सुधीर पाटील यांनी गणेश मंडळाने शेतकरी बाबत देखावे गणेश मंडळाने करावेत अशा सुचना देण्यात आल्या शांतता समितीची बैठक शांततेत पार पडली होती.केवळ आमदार बैठकीस हजर नसल्याचे शल्य निर्माण झाल्याने त्यांच्या हट्टापोटी पोलिस व तहसिल प्रशासनाने आज सोमवार रोजी दुसऱ्यांदा शांतता बैठकीचे आयोजन पुन्हा त्यात जागी करण्यात आले.यावेळी पोलिस प्रशासन काम निट करीत नसून वसुली करीत आसल्याचा आरोप आमदार यांनी भाषणातुन करताच उपविभागीय पोलिस अधिकारी लोढा आक्रमक होत आमदार यांना जाब विचारत वसुली करणाऱ्यांचे पुरावे द्या कार्यवाही करतो म्हणत आमदार पोलिस अधिकाऱ्यांत चांगलीच खडाजंगी होताना शांतता समिती बैठकीस आलेल्यांची चांगलीच करमणूक होत होती वाद शांत झाल्यावरही पुन्हा पुन्हा खडाजंगी होत होती याप्रकारामुळे बैठक शांतता समितीची की खडाजंगीची अशीच चर्चा शहरात जोरदार रंगलेली होती या खडाजंगी मुळे आमदार पुन्हा वादग्रस्त चर्चेत आलेले आहेत.