मागील दोन वर्ष कोरोना संसर्गामुळे सार्वजनिक स्वरुपात गणेशोत्सव साजरा करण्यात आला नव्हता . परंतु यावर्षी पुर्ण हर्षोल्हासात सार्वजनिक स्वरुपात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे . गणेशोत्सव साजरा करतांना गणेश मंडळ व पोलीस प्रशासनांनी योग्य समन्वय ठेवून साजरा करणे आवश्यक आहे . वाशिम जिल्हयात एकुण 710 गणेश मंडळांची स्थापना होणे संभावित असुन त्यामध्ये शहरी भागात 270 मंडळे आणि ग्रामीण भागात एकुण 440 मंडळ स्थापन होणार आहेत . गणेशोत्सव दरम्यान जिल्हा प्रशासन आणि जनता यांचे मध्ये समन्वय रहावा या करीता दिनांक 23.08.2022 रोजी 11.00 वा . जिल्हाधिकारी कर्यालय , वाशिम येथे जिल्हाधिकारी , वाशिम यांचे अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक , वाशिम आणि इतर विभागाचे अधिकारी , गणेश मंडळ अध्यक्ष व कार्यकर्ते , शांतता समिती सदस्य यांची जिल्हास्तरीय समन्वय व शांतता बैठक पार पडली आहे . गणेशोत्सव विसर्जन मार्गातील समस्या, अडथळे जाणुन घेण्यासाठी संबंधित विभागांचे वरीष्ठ अधिकारी यांनी संयुक्तिरीत्या मार्गाची पाहणी केली आहे . आज दिनांक 29 ऑगष्ट रोजी जिल्हाधिकारी वाशिम,पोलीस अधिक्षक वाशिम यांनी वाशिम शहर येथील गणेशोत्सव विसर्जन मार्गाची पाहणी केली आहे . उपविभाग स्तर आणि पोलीस स्टेशन स्तरावर संबंधित अधिकारी यांनी संयुक्तिकरीत्या विसर्जन मार्गाची पाहणी केली आहे . विसर्जन मार्गात असणारे खडडे , नादुरुस्त वाहने , लोंबकलेल्या विदयुत तारा,केबल इत्यादी अडथळे दूर करण्याचे प्रयत्न प्रशासन स्तरावर सुरु आहेत . अदयाप पावेतो गणेशोत्सव निमीत्त पुर्व तयारीचा आढावा म्हणून पोलीस अधिक्षक , अपर पोलीस अधिक्षक , उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कडुन बिट अंमलदार आणि शांतता समिती सदस्य यांच्या मिटींग घेण्याचे सत्र सुरु आहे . अदयाप पावेतो एकुण 360 ग्रामभेटी दिल्या असून जनतेशी थेट संपर्क साधुन गणेशोत्सव साजरा करतांना निर्माण होणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यात आला आहे . गणेशोत्सव दरम्यान कोणताही अडथळा निर्माण होऊ नये याकरीता अदयाप पोवेतो एकुण 06 पोलीस स्टेशन स्तरावर रुट मार्च आणि दंगा काबु योजना राबविण्यात आलो आहे . इतर ठिकाणी घेण्याचे नियोजित आहे . अवैध धंद्यावर प्रतीबंध घालण्याच्या अनुषंगाने जुलै 2022 पर्यंत जुगार 556 , दारुबंदी 1272 केसेस तसेच माहे ऑगस्ट मध्ये जुगार 50 दारुबंदी 220 केसेस करण्यात आल्या आहेत . समाजकंटक यांचे कडुन अनुचित प्रकार घडु नये याकरीता प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे . समाजकंटक यांचे कृत्यांवर निगराणी ठेवणे करीता विसर्जन मार्गात ठिकठिकाणी सी सी टी व्हि कॅमेरा लावण्यात येत आहेत . प्रत्येक गणेश मंडळावर QR कोड लावण्यात येणार असुन भेट देणारे पोलीस अधिकारी अंमलदार यांचे कडुन नियमित QR कोड स्कॅन करण्यात येईल . सराईत गुन्हेगार यांचे वर वचक रहावा या करीता यापुर्वीच पोलीस स्टेशन स्तरावर विविध दिवशी कॉम्बोग ऑपरेशन आणि नाकाबंदी राबविण्यात आले आहे . संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉइंट नेमण्यात येणार आहेत . ध्वनी पातळीच्या मर्यादेबाबत ध्वनि प्रदुषण ( नियंत्रण व नियमन ) नियम 2000 मधील तरतुदींचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशांचे संतोतंत पालन करावे . गणेश मंडळांनी सणाचे पावित्र्य राखुन सामाजीक एकोपा टिकुन राहावा या दृष्टीने नियमांचे काटेकोरपणे पालन करून सण उत्साहात साजरा करावा . श्री गणेश उत्सव निमित्त वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 01 पोलीस अधिक्षक 01 अपर पोलीस अधिक्षक , 04 पोलीस उपअधिक्षक , 15 पोलीस निरीक्षक , 50 सहायक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी , 01 SRPF कंपनी , 02 RCP पथक 02 QRT पथक , 1100 पोलीस अंमलदार 500 होमगार्ड इतका बंदोबस्त नेमण्यात आला आहे . कोणतीही कायदा व सुव्यवस्था परीस्थीती हाताळण्यास वाशिम जिल्हा पोलीस दल सुसज्ज आहे . आगामी गणेशोत्सव नियमांचे पालन करुन उत्साहात आणि शांततेत साजरा करा. असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.