पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथील प्रांगणात उभारण्यात येणारा अहिल्यादेवींचा पुतळा अश्वारूढच उभारण्यात यावा तसेच स्मारक समिती बरखास्त करून योग्य लोकांना घेऊन नविन समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथे अहिल्यादेवीचे स्मारक मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी शंभर कोटीची तरतूद ही करण्यात आली आहे. त्या स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी ही यावेळी करण्यात आली. या मागणीचे निवेदन सोमवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात दादा पाटील यांना देण्यात आले.

यावेळी नामविस्तार समितीचे अध्यक्ष शिवाजी बडंगर ,शिवाजी राजे कांबळे, माऊली हळणवर, प्रा.सुभाष मस्के, सोमेश क्षिरसागर, अमोल कारंडे, बापुसाहेब मेटकरी, नागेश वाघमोडे, बिरूदेव शिंगाडे, रणजित महानवर, धनाजी गडदे, वैभव मासाळ, बाळासाहेब टकले, प्रकाश कोळेकर, अंगद देवकते, अशोक शेळके यांच्यासह प्रमुख समाज बांधव उपस्थित होते.