पाथरी:-स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेतर्गत पुरवठा विभागाने ई-पाॅस मशिन मधील साॅफ्टवेअर अपडेट केले.परंतु अपडेशनंतरही मशीन मधील गोंधळ कायम आहे.
वांरवार उद्भवणाऱ्या सर्वरच्या समस्येमुळे धान्य वितरणात अडचणी येत असल्याने रेशन दुकानदारांना लाभार्थ्यांनच्या तिव्र रोषाला सामोरे जावे लागत आहे.राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून महीन्याकाठी धान्य वितरीत केले जाते.ई-पाॅस मशिनवरुन हे धान्य लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येते.मात्र ई-पाॅस मशिनच्या अडचणींचा डोंगर कायम आहे.पुरवठा विभागाने मशीन मधील साॅफ्टवेअरचे अपडेशन केले.पण त्यानंतरही सर्वर मशीनवर लाभार्थ्यांचा थम स्कॅनिंग समस्या कायम आहे.त्यामुळे रेशन दुकानासमोर तास-तास हातात पीशव्या घेवुन रांगेत निष्ठेने राहुन देखिल धान्य मिळत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.तालुक्यातील महीण्याकाठी सर्वच रेशन दुकानामधुन हजारोंच्या संख्येने अधिक लाभार्थ्यांना रेशन वाटप केले जाते .परंतू सर्वरची समस्या कायम असल्याने मशीन बंद पडत आहे.विषेशत:ग्रामिण भागात ही समस्या प्रकर्षाने जाणवत आहे.याबाबत पुरवठा विभागाकडे तक्रारी करुनही त्यामध्ये सुधारणा होत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजीचा सुर निघत आहे.