पक्ष वाढी साठी मी सदैव कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा आहे - राजेश टोपे 

औरंगाबाद :- दि.२८ ऑगस्ट (दीपक परेराव) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औरंगाबाद पूर्व विधानसभा कार्यकर्ता मेळावा आणि पद नियुक्ती कार्यक्रमाचे आयोजन औरंगाबाद पूर्व विधानसभा अध्यक्ष विठ्ठलराव जाधव आणि कार्याध्यक्ष जावेद नवाज खान यांच्यातर्फे करण्यात आले होते.

जय भवानी नगर येथील वडजे मंगल कार्यालयात रविवारी सायंकाळी राज्याचे माजी आरोग्य मंत्री तथा राष्ट्रवादी औरंगाबाद संपर्क प्रमुख राजेश भैय्या टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला. आतिषबाजी आणि ढोल ताशाच्या गजरात तसेच प्रमुख उपस्थितींचे फुलांच्या वर्षाव करून या ठिकाणी स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती विशेष म्हणजे कार्यकर्ता मेळावा तीन तासाच्या आसपास चाललेला या कार्यक्रमास संबोधीत करताना म्हणाले की मी पक्ष वाढीसाठी संपर्कप्रमुख या नात्याने कार्यकर्त्यांच्या पाठीशी नेहमी उभा असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. शहरातील विविध विकास कामावर देखील त्यांनी मार्गदर्शन केले. सरकारमध्ये राष्ट्रवादी असताना आपण केलेले कामे जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम हे कार्यकर्त्यांचा असून नागरी समस्या साठी सदैव आपण लढत राहावं आणि ज्या ठिकाणी माझी गरज असेल त्या ठिकाणी मी हजर राहील असेही ते म्हणाले. कार्यक्रमा दरम्यान शिवसेना, भाजप आणि काँग्रेस पक्षामधून अशोक गायकवाड, दिलीप हरणे, वसंत महाराज, गणेश सोनार, बाळासाहेब सोनवणे, अमोल जाधव, माणिकराव शिंदे, सुभाष जगताप या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, विद्युत आणि सिडको - हडकोतील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण पुढाकार घेवू त्याचबरोबर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये वाढते ते शाखेचं आयोजन करण्याच्या सूचना राजेश टोपे यांनी केल्या शहरात प्रत्येक पाच - पाच वार्डाचे मेळावे आयोजित करून सर्व सेलचे सर्व वार्डामध्ये पदाधिकारी नेमणूक झालीच पाहिजे असे आदेशही त्यांनी दिले. अतिशय नियोजनबद्ध आणि सुंदर कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठलराव जाधव आणि जावेद खान यांनी केल्याचे टोपे यांनी कौतुकही या ठिकाणी केले.

या प्रसंगी खालील पूर्व मधील कार्यकर्त्यांना संपर्क प्रमुख राजेश टोपे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पद देऊन नियुक्ती पत्र देण्यात आली.

माजी नगरसेवक राजाराम मोरे, अशोक गायकवाड, प्रशांत जगताप, धर्मराज गणगे, रवी तांगडे, सुनील देवकर राहुल मगर, कलीम शेख, मोहम्मद अजहर, कैसर शेख, अरवींद उगले, रजा अन्सारी, राहुल कावरे, सुनील घुले, तुषार शिंदे, गणेश सोनार, दिलीप हरणे,आफताब खान, आर बी चव्हाण, समीर खान, सलमान शेख, रफीक शेख, फिरोज खान, रवींद्र बोचरे, अंकुश जाधव,नशीर पटेल, शेख हाशम, फय्याज खान, विखार पटेल, सय्यद युसुफ, आलीयार खान, शेख इलीयास, शेख नय्यर,शेख जमीर, परवेज शेख, सय्यद कदिर, अनिल दामले, सरफराज शेख, शाहरुख शेख, शेख इरफान, शेख फारुख, शकील खान, शेख फैय्याज इत्यादींना पदे वाटप करण्यात आली.

यावेळी पूर्व विधानसभा कार्यकर्ता मेळाव्यामध्ये प्रदेश उपाध्यक्ष इलीयास किरमाणी, प्रदेश सचिव प्रा. माणिकराव शिंदे, डॉ.बाळासाहेब पवार, मेहराज पटेल, मनीषा पवार, युवक शहराध्यक्ष डॉक्टर मयूर सोनवणे, कार्याध्यक्ष कय्युम अहेमद आदींनी मार्गदर्शन केले. सर्वांनी शहरातील विविध नागरी समस्या कडे संपर्क प्रमुखाचे लक्ष वेधले पाणीपट्टीसाठी केलेले आंदोलन आणि मिळवलेल्या यशाबद्दल माणिकराव शिंदे यांनी मार्गदर्शन केले. पक्ष वाढीसाठी सर्वांनी सोबत मिळून काम करण्याची गरज असल्याचे इलीयास किरमाणी म्हणाले याप्रसंगी मोहम्मद हबीब मुन्नाभाई शहर जिल्हा उपाध्यक्ष, आयुब खान ,मुक्तार खान,शेख सलिम, इब्राहिम पठाण, शेख आसिफ, मोतीलाल जगताप यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र तांगडे पाटील यांनी तर आभार प्रदर्शन मोहम्मद हबीब मुन्नाभाई यांनी केले.