तालुक्यातील ग्रामपंचायत बोकडविरा हद्दीतील स्मशानभूमीचे मोठ्या प्रमाणात दूरावस्था झाली होती. सदर स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी अनेक दिवसांपासून ग्रामस्थ करित होते. जनतेची ही समस्या लक्षात घेउन बोकडविरा ग्रामपंचायतचे सरपंच मानसी देवेंद्र पाटील व प्रमुख कार्यकर्त्यांनी या कामी पुढाकार घेऊन नूतनीकरणाचे काम पूर्णत्वास नेले.उपस्थित सर्व मान्यवरांनी नारळ वाढवून श्री गणेशा केला.यावेळी मानसी देवेंद्र पाटील (सरपंच बोकडविरा ग्रामपंचायत ), शेखर पाटील (उपसरपंच ) त्रिशुल ठाकूर (अध्यक्ष ग्रा. सु. मंडळ ),भुषण पाटील जेएनपीटी विश्वस्त,गोपाळ पाटील उरण उत्कर्ष समिती अध्यक्ष , सुर्यकांत पाटील माजी अध्यक्ष ग्रा. सु.मंडळ , मनोज पाटील,ग्रामपंचायत सदस्य - राकेश पाटील, कल्पेश पाटील , जयवंत पाटील,वंदना पाटील, हेमलता. मे.पाटील,निर्मला पाटील,शितल पाटील, सुचिता पाटील, खंडेश्वर पाटील , जनार्दन ठाकूर , श्यामसुंदर पाटील, पंढरीनाथ पाटील, विरेंद्र पाटील. गिरीष पाटील, अशोक पाटील, गजानन पाटील,राजेश ठाकूर, यशवंत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.सरपंच मानसी पाटील यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष, सर्व सदस्य, उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. मानसी पाटील यांनी आपल्या मनोगतात ग्रामस्थांनी संघटित राहून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या संघटित होऊन सिडको कडुन पूर्ण करून घेऊया असे ग्रामस्थांना आवाहन केले.यावेळी भूषण पाटील, गोपाळ पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करून नूतनीकरणाच्या कामाचे कौतुक केले.व पक्ष भेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन समस्या सोडवाव्यात असे आवाहन केले.
सरपंच मानसी पाटील व प्रमुख कार्यकर्त्यांनी स्मशान भूमीच्या नूतनीकरणासाठी सिडकोकडे सतत पाठपुरावा केला व नूतनीकरणाचे काम करून घेतले. स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम झाल्याने बोकडविरा ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत सरपंच मानसी देवेंद्र पाटील , ग्रामपंचायत बोकडविरा, ग्रामसुधारणा मंडळ बोकडविराचे आभार मानले आहेत.