सोलापूर: - हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती दिन संपुर्ण भारत देशात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने राजीव गांधी इंडोरस्टेडीयम येथे सोलापूर शहर जिल्ह्यातील हँडबॉल, बेसबॉल, सॉफ्टबॉल, क्रिकेट, कबड्डी, खो खो, तलवारबाजी, रायफल शूटिंग, आर्चरी, बास्केटबॉल, स्विमिंग, योगा, टेनिस, अशा खेळांमधील १३५ खेळाडूंचा राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. प्रथम कार्यक्रमाचे संयोजक व प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी प्रास्ताविक करुन सर्व मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, राजेन्द्र हजारे, बिज्जू आण्णा प्रधाने, विद्या लोलगे, संयोजक प्रशांत बाबर जुबेर बागवान, सुहास कदम, राम साठे, निशांत साळवे, ज्योतिबा गुंड, मिलिंद गोरे, सतीश भोसले, अजमल शेख, आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातील खेळांचा व खेळाडूंचा विकास होण्यासाठी राष्ट्रवादी काँगेस पार्टी नेहमी सहकार्य करेल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहमद मसुलदार यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप कुसेकर, आकाश अमदिपुर, प्रणव दरेकर, राज माने, अमोग जगताप, गौरव वाघमोडे, निवास उगले, चिन्मय उत्पात, आदींनी परिश्रम घेतले