बांधावरचे गवत उपटून बांध का कोरतेय असं विचारतात महिलेवर दगडाने मारहाण करून तिघांनी तिच्या मुलास तसेच सुनेला जबर मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील सुदामवाडी शिवारात घडली. तिघां आरोपी विरुद्ध शिऊर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सफियाबादवाडी शिवारातील गट नंबर 1387 मध्ये चंद्रकला छबू पठारे(७०) मुलगा रतन पठारे(३०) आणि सून मनीषा पठारे (२५) तसेच नातवसह शेतात शेतवस्ती करून राहतात. त्यांना दोन एकर शेती असून ती कसून कुटुंबाचा ते उदरनिर्वाह करतात. रविवारी तारीख 28 रोजी सायंकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे चंद्रकला पठारे या शेतात मशागत करत असताना त्यांचे शेत शेजारी उमाबाई या बांधावर गवत काढत बांध कोरत असताना चंद्रकलाबाई यांनी त्यांना यापासून रोखले असता उमाबाईने शिवीगाळ करत सुरुवात केली. दरम्यान ही बाब उमाबाईंनी पुंडलिक विलास पवार, गणेश विलास पवार, विलास लक्ष्मण पवार यांना सांगितली. यावर चिडलेल्या तिघांनी चंद्रकला छबु पठारे यांच्यासह रतन छबु पठारे आणि मनीषा रतन पठारे या तिघांवर हल्ला करून त्यांना लाथा बुक्क्यांनी, लाथा काठ्यांनी व दगडाने जबर मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली. या रतनच्या डोक्याला गंभीर इजा झाली तर चंद्रकलाबाई आणि मनीषा यांच्या हाताला मोठा मार लागला आहे. तुम्ही शेती कसायच्या लायकीचे नाहीत, तुमची जमीन आम्हाला द्या म्हणत दमदाटी  केल्याने पीडित पठारे कुटुंबाने भेदरलेला अवस्थेत शिऊर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना हाकिकत सांगितली. त्यानुसार शिऊर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.  मात्र ही बाब सोमवारी बसपाचे जिल्हा प्रभारी बाबासाहेब पगारे यांना समजताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती, त्यानुसार आरोपी पुंडलिक विलास पवार, गणेश विलास पवार, विलास लक्ष्मण पवार सर्व राहणार सुदामवाडी यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.