यवतमाळ : शहरात सर्वांसाठी घरे ही योजना राबविण्यात येत आहे.  भूमिअभिलेख कार्यालयाने तारपुरा, तलावफैल, पावर हाउस, सेवानगर, कुंभारपुरा, इंदिरानगर, पाटीपुरा या परिसराचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले.काही ठिकाणचे सर्वेक्षण अपूर्ण आहे. ते सवेर्र्क्षण पूर्ण करून अतिक्रमित जमिनीची मोजणी करून कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे, त्यांना घरकुलाचा लाभही देण्यात यावा. या मागणीसाठी यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.