प्रियकराचा लग्नाला नकार, जीव देण्यासाठी प्रेयसी धावत्या लोकलसमोर! शॉकिंग व्हिडीओ समोर

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

मुंबई :- (नितीन थोरात) 22 वर्षीय तरुणीने रविवारी दुपारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.प्रियकराने लग्नाला नकार दिला म्हणून आत्महत्येसाठी लोकलखाली जीव देण्याच्या इराद्याने ही तरुणी आली होती. धावत्या लोकलसमोर ती उभी राहिली. लोकलच्या दिशेने तोंड करुन ही तरुणी उभी होती. या तरुणीने केलेल्या आत्महत्येचा प्रयत्नांना लोकल चालकाच्या प्रसंगावनधानामुळे यश येऊ शकलं नाही. थोडक्यात या तरुणीचा जीव वाचवलाय. ही सगळी घटना रेल्वे स्ठानकापासून हाकेच्या अंतरावर घडली. त्यामुळे रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या प्रवाशांमध्येही घबराट उडाली. रेल्वे स्थानकावरुनच प्रवाशांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली होती. महिलेला वाचवण्यासाठी, तिने बाजूला व्हावं यासाठी प्रवासीही रेस्वे स्थानकातून मदतीसाठी आवाज देऊन लागले. एका प्रवाशाने या घटनेचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला. या व्हिडीओतील प्रवाशांचे आवाज आणि धावत्या लोकलमध्ये उभं राहून महिलेनं केलेला आत्महत्येसाठी प्रयत्न, काळजाचा थरकाप उडवणाराच होता.

नेमकी कुठं घडली घटना?

रविवारी दुपारी भायखळा रेल्वे स्थानकात ही घटना घडली. ही तरुणी दादर येथे राहणारी असल्याचं कळतंय. प्रियकराने लग्नासाठी नकार दिला म्हणून या तरुणीने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं होतं. विशेष म्हणजे ज्या भायखळा रेल्वे स्थानकात ही घटना घडली, त्याच रेल्वे स्थानकावर या तरुणीला तिच्या प्रियकराने लग्नासाठी नकार दिल्याचं सांगितलं जातंय. या तरुणीचा प्रियकरही रेल्वे स्थानकात यावेळी हजर होता. त्याच्या देखतच जीव देण्याचा प्रयत्न या तरुणीने केला होता.लोकल भायखळा स्थानकात येऊन थांबणार असल्यानं तिचा वेग कमी होता. त्यामुळे लोकल थांबवणं चालकाला शक्य झालं. शिवाय दोघांनी धावत येऊन या तरुणीला रेल्वे ट्रॅकवरुन बाजूला हटवलं. व्हिडीओमध्ये एक आरपीएफ जवान तरुणीच्या दिशेने धावत गेल्याचंही दिसून आलंय. वेळीच या तरुणीला रेल्वे ट्रॅकवरुन हटवलं नसतं, तर अनर्थ घडला असता. थोडक्यात ही तरुणी वाचली असल्यानं भायखळा स्थानकातील प्रवाशांचाही जीव भांड्यात पडला.आरपीएफ निरीक्षक उपेंद्र डागर यांनी या तरुणीला आणि तिच्या प्रियकराला अखेर ताब्यात घेतलं. त्या दोघांचही समुपदेशन केलं. नंतर दोघांनाही घरी सोडण्यात आलं. पण या घटनेमुळे भायखळा स्थानकातील लोकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. पण लोकल चालकाच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळला होता.