पेरणे येथे विविध विकास कामाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक 29 रोजी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला. पेरणी गावातील कोळपे वस्ती व कळम मळा या रस्त्यांच्या कामासाठी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर करून या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले त्याचप्रमाणे गावातील ग्रामदैवत पाचपीर बाबा मंदिर सुशोभिकरण दहा लाख रुपयांचे उद्घाटन, पेरणी देवराई प्रकल्प येथे वृक्षारोपण आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले. यावेळी पेरणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.