जोगीसाखरा जवळील शंकरनगर नाल्यालगत जंगलात वाघाने हल्ला करून एकाचा 

  बळ

मृतदेहा जवळच परीसरातील नागरीकाचा ठिय्या

जोगीसाखरा - आतापर्यंत नरभक्षक वाघांनी आरमोरी अरसोडासह विविध ठिकाणी १० बळी घेतल्यानंतर मानवी रक्ताची चटक लागलेल्या नरभक्षक वाघाने ११ वा बळी घेतल्याची घटना आज आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा गट ग्रामपंचायतीमध्ये येनारे सालमारा येथील अत्पभुधारक शेतकरी सालमारा येथुन शंकरनगर जंगलातील कम्पारमेट नंबर ४७ रस्तेने सायकलींचे जात असताना नाल्याला पुल नसल्यामुळे उतरुण पाई जात असताना रस्तेच्या कडेला दबा धरून बसलेल्या वाघाने ईसमावर हल्ला करुन काही अंतरावर फरकडत नेऊन जागीच ठार केले ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली आतापर्यंत ११ वा बळी घेतला 

आज सकाळच्या आठच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील सालमारा येथील अत्पभुधारक शेतकरी बळिराम कोलते वय ४७ वर्ष काही कामानिमित्त सालमारा येथुन शंकरनगर कच्चा रस्तेनी जंगलातुन कम्पारमेट नंबर ४७ सायकलिने जात असताना जगला लगत नाल्याला पुल नसल्यामुळे सालकलीवरुण उतरुण पाई जात असताना रस्तेच्या कडेला दबा धरून बसलेल्या वाघांनी हला करुन फरपटत नेऊन त्याचा बळी घेतल्याची माहिती सरपंच संदिप ठाकुर रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोडाम अखिल भारतीय किसान सभा शेतमजूर युनियनचे अमोल मारकवार याना मिळताच घटना स्थळ गाडुण पाहणी केली व वनविभागाचे अधिकारी वेळेवर उपस्थित न झाल्याने घटनास्थळीच ठिय्या आंदोलन करण्यात आले जो पर्यंत अधिकारी येऊन मागच्या पुण करणार नाही तो पर्यंत मृतदेह वनविभागाच्या ताब्यात देणार असा पवित्रा घेतल्याने बराच काळ वातावरण चिघळल्यामुळे आरमोरी वनपरीक्षेत्र अधिकारी अविनाश मेत्राम यांनी पोलिसांना पाचारण करुन विविध मागण्यां यात मृतकाच्या कृटुबियाना अत्यविधी साठी जागेवर ५० हजार रुपये द्या सानुसह अनुदानात वाढ करुण शेतकऱ्यांना शेतिवर जाण्यासाठी संरक्षण द्या वाघाचा बंदोबस्त तात्काळ करा असे मागण्या रेटुन धरल्या होत्या यात देसाईगंज सहायक उपवनसंरक्षक चव्हान यांनी मागण्या मान्य केल्याने वातावरण आटोक्यात येऊन पोटमाडम साठी मृतदेह पाढवले आहे 

अधिक तपास सहायक उपवनसंरक्षक चन्हाण वनपरीक्षेत्र अधिकारी अविनाश मेत्राम पोलिस निरीक्षक मनोज काळबाधे उपक्षेत्र सहायक गाजी शेख उपक्षेत्र सहायक राजु कुंभारे वनरक्षक करकाडे वनरक्षक गेडाम करीत आहेत.

यात वाघानी बळी घेतलेल्या जगलालगत शंकरनगर जोगीसाखरा सालमारा परीसरातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात शेत्या असल्यामुळे शेतकऱ्यांत दहशत निर्माण झाल्याने तात्काळ वाघाचा बंदोबस्त करा अन्यथा वनपरीक्षेत्र कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा जोगीसाखरा गट ग्रामपंचायतीचे सरपंच संदिप ठाकुर रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात परीसरातील जनतेनी दिला आहे.