हवेलीत ई-केवायसी पाहणी शिबिर

Sponsored

कृष्णा हाइट्स - कोटा

कृष्णा हाइट्स की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |

हवेली तहसील कार्यालयाच्या वतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या लाभार्थी यांची पडताळणी (ई केवायसी) करण्यासाठी सोमवार पासून विशेष शिबिराचे आयोजन केले आहे.हे शिबिर (दि.२९,३०,३१)ऑगस्टपर्यंत चालणार असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद पहावयास मिळणार आहे. हवेली तालुक्यातील अनेक गावांमध्ये तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, सहकारी सोसायटी बोर्ड, पतसंस्था, बँक, चावडी, महा ई-सेवा केंद्र या ठिकाणी शिबिरांचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सूचनांनुसार महसूल, कृषी पंचायत समिती या विभागाकडील अनुक्रमे तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांच्यामध्ये वाटुन दिलेल्या गावांमध्ये हे कर्मचारी सदर कामे करतील. या वेळी तहसीलदार कार्यालयाकडून गावातील पडताळणी (ई केवायसी) न केलेल्या लाभार्थ्यांची यादी तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, तसेच पतसंस्था अशा ठिकाणी प्रसिद्ध केली जाईल. नागरिकांनी आपली पडताळणी ही (केवायसी) करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन हवेलीच्या नायब तहसीलदार तृप्ती कोलते यांनी केले.