दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावच्या शिवारातील भीमा नदी पात्रात शनिवारी सायंकाळच्या सुमारास एका अनोळखी पुरुषाचा कुजलेला मृतदेह मंद्रूप पोलिसांना आढळला आहे.संबंधित अनोळखी पुरुषाचा दोरीने गळा आवळून त्याला भीमा नदीच्या पात्रात टाकून देण्यात आले आहे.सदर अनोळखी पुरुष जातीचे प्रेत अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयोगटातील आहे.त्याचा बांधा मध्यम असून उंची अंदाजे ५ फुट ६ इंच,चेहरा-गोल असून केस पुढील बाजूस विरळ मध्यभागी टक्कल आहे.त्याच्या अंगात पांढ-या रंगाचे हाफ बनियन असून त्यावर DOLLAR असे प्रिंट केलेले आहे.काळसर रंगाचा पॅन्ट,कमरेला काळा कडदोरा,डाव्या हाताच्या मनगटावर लाल पिवळ्या रंगाचा दोरा,अन्डरवेअर RONAX 90cm असे प्रिंट केलेले आहे.

मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावातील नागरिकांनी आपल्या गावातून कोणी बेपत्ता झालेले असल्यास त्यांनी तात्काळ मंद्रूप पोलीस ठाण्याशी प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा सदर अनोळखी पुरुषाच्या मृतदेहाशी संबंधित काही माहिती असल्यास त्यांनी मंद्रुप पोलीस ठाण्याच्या (०२१७)२२५५५३३,सपोनि रविंद्र मांजरे यांच्या ८६००३८६३४६,पोसई अगितकुमार करपे यांच्या ९६५७४७०८०८ या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.