नातीला फुगा घ्यायला गेले आणि झाला सिलेंडर चा स्पोट 2 वर्षाच्या चीमुकलीचा जागीच मृत्यू.

अमरावती:- (नितीन थोरात) जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणी यात्रेमध्ये फुगे विकण्यासाठी आलेल्या एका विक्रेत्याकडे असलेल्या गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाल्याने एका 2 वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला आहे.या दुर्दैवी घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडले नेमके?

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथील ताना पोळ्याच्या निमित्ताने यात्रा भरवण्यात आली होती. दरवर्षी ही यात्रा भरवली जाते. या यात्रेनिमित्त गावातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी यात्रेत लहान मुलांसाठी खेळणीची दुकानं सजली होती. या यात्रेमध्ये हवेत उडणारे अर्थात गॅसचे फुगे विकण्यासाठी विक्रेत्यांनी गर्दी केली होती. मात्र गॅसचे फुगे विकणाऱ्याकडे असलेल्या गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाल्यामुळे दोन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

परी सागर रोही असे मृत चिमुकलीचे नाव असून ती आपल्या आजोबासोबत गावाकडील तान्हा पोळ्याच्या यात्रेत फिरण्यासाठी गेले होते. उडणारा फुगा बघून ती आपल्या आजोबासोबत फुगे विक्रेत्याजवळ गेली होती. आजोबानेही लाडाने आपल्या नातीला फुगा घेऊन देण्यासाठी घेऊन गेले होते पण अचानक फुगे विक्रेता जवळील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि यामध्ये परीचा एक पाय शरीरापासून वेगळा झाला. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिच्यावर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.