शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाने निकालाची परंपरा राखली कायम
पाचोड(विजय चिडे)महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दोन महीन्यापूर्वी घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी(दि.२) रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला. यामध्ये पैठण तालुक्यातील पाचोड येथील शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल नूकताच ८९.६१टक्के इतका लागला आहे
मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी प्रमाणपत्र परीक्षे चा निकाल घोषित झाला असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाने निकालाची उज्वल परंपरा कायम राखली आहे.यावर्षी विद्यालयातून कृष्णा धोंगडे90.40%गीतांजली अप्पासाहेब नेमाने 89.20%, भक्ती दत्तात्रय भुमरे 88.20% गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे तसेच संस्थेचे अध्यक्ष राजू नाना पाटील भुमरे माजी जिल्हा परिषद सभापती विलास बापू भुमरे,सरपंच शिवराज भुमरे, मुख्याध्यापक राम पाटील गटकळ तसेच शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.