अमरावतीत पोलीस कर्मचारी याने दारूच्या नशेत धिंगाणा घातला. बस वाहकालाही अश्लिल शिवीगाळ केली. अमरावती जिल्ह्यात एसटी बस मध्ये हा प्रकार घडला. अमरावती - दर्यापूर मार्गावरील खोलापूरमधील येथील हा धक्कादायक प्रकार चा विडिओ व्हायरल होऊन समोर आला आहे. दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मद्यपी पोलीस कर्मच्याऱ्याचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अक्षय बेलसरे असे दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. पोलीस कर्मचारी पोलीस मुख्यालयी नोकरीवर कार्यरत होता. त्याने एसटी बस चालकास वाद घातला होता. चालकाने थेट एसटी बस पोलीस ठाण्यात नेली. पोलीस कर्मच्याऱ्याविरोधात विविध गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले. विठाई असे एसटी बस चे नाव आहे. अमरावती - दर्यापूर मार्गावरील खोलापूर येथील धक्कादायक घटना घडली आहे.