सपोनि गणेश सुरवसे यांना पोलिस अधीक्षकांच्या हस्ते प्रशंसापत्र

पाचोड/ पैठण तालुक्यातिल आडगाव व दाभरुळ शिवारात देवदर्शन करून औरंगाबादकडे घरी परतत असणारी एक चारचाकी कार धूळे-सोला पूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास लघूशंखासाठी थांबले असता अज्ञात चार जणांनी कारमध्ये असणाऱ्या कुंटुंबासह मारहाण करून त्यांच्याकडील ४० हजार रूपयांचा ऐंवज लुटल्याची घटना घडली होती यातिल दरोडा टाकणऱ्यां टोळीला पाचोड पोलिसांनी तपासणीची चक्रे फिरवून आरोपीना गजाआड केले होते. या गुन्ह्यांच्या तपासात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना औरंगाबाद पोलिस अधीक्षक कार्यालय ग्रामीण यांच्या जिल्हा पोलीस अधीक्षक मनिष कालवनिया यांच्या हस्ते प्रशंसापत्र पाचोड पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे,पोलिस उपनिरिक्षक सुंशात सुतळे, पोलिस उपनिरिक्षक सुरेश माळी यांना गुन्हे आढावा बैठकीमध्ये सत्कार करण्यात असून प्रशंसापत्र देऊन सन्मान केला आहे.