अकोला :- (नितीन थोरात )दिनांक -26 ऑगस्ट रोजी गुन्हेगार शोध पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की पिवळ्या रंगाची गाडी क्रमांक अपे MH30-AB-3172 माल वाहू तीन चाकी वाहनात बाळापूर कडून अकोल्यात शासकीय अनुदानित धान्य जास्त दरात विक्री करता येत आहे, अशी खात्री लाईक बातमी नुसार, तुषार हॉटेल समोर नाकाबंदी करून सदर वाहन तिथे थांबून गाडी चालकास ना विचारले असता त्यांनी आपले नाव आशिष भगवान घनमोडे वय 22 राहणार तेलीपुरा बाळापुर सांगितले सतरा प्लास्टिकचे पोते व तीन गव्हाचे होते असे वीस होते स्वस्त धान्य एकूण एक लाख 63 हजार 475 रुपयाचा मध्यमान मिळून आला त्याला सदर धान्य बाबत विचारले असता त्याने संबंधित धान्य हे खेडेगावातून कमी दराने विकत घेऊन जास्त दरात विकण्यासाठी नेत असल्याचे सांगितले त्यांचेही कृत्य 37 वस्तू कायद्याप्रमाणे असल्याने त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन अकोला येथे गुन्हा दाखल नोंदणीत आले आहे. सदर ची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक सा.जी.श्रीधर, सा.अप्पर पोलीस अधीक्षक एम.राऊत मॅडम,यांच्या मार्ग दर्शनना खाली पो. नि.विलास पाटील,आणि विशेष पथक अंमलदार यांनी केले.