रांजणगाव गणपती:- महाराष्ट्र राज्यात कुठेही कामगारांवर अन्याय झाल्यास त्यांना कायदेशीर मार्गाने मदत करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला जाईल. भांडवलदारां कडुन कष्टकरी मजुरांची होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी यापुढे राज्यभर मानव विकास परीषदेच्या माध्यमातून आवाज उठवला जाईल असे प्रतिपादन रांजणगाव गणपतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि उद्योजक संदीप कुटे यांनी केले.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
मानव विकास परीषद महाराष्ट्र राज्य कामगार युनियनच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच संदीप कुटे यांची निवड करण्यात आली. मानव विकास परिषदेचे संस्थापक तसेच राष्ट्रीय अध्यक्ष अफसर शेख यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
यावेळी मानव विकास परीषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक चौधरी, राष्ट्रीय महासचिव बाळासाहेब लोंढे, प्रदेशाध्यक्ष बळवंत मनवर, प्रदेश सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष असलम सय्यद, युवक प्रदेशाध्यक्ष दत्तात्रेय निफाडे, युवती प्रदेश अध्यक्षा जयश्री अहिरे, राष्ट्रीय संपर्कप्रमुख अन्सार शेख, संस्थेचे खजिनदार अलीम सय्यद, आदी पदाधिकारी उपस्थित होते. सर्वानुमते मानव विकास परीषद महाराष्ट्र राज्य कामगार युनियनच्या प्रदेशाध्यक्षपदी कुटे यांची निवड करण्यात आली.