वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या निर्देशाप्रमाणे वाशिम जिल्ह्याची महिला कार्यकारिणी राज्याच्या अध्यक्षा रेखाताई ठाकुर यांनी जाहीर केली.  वाशिम जिल्हा महिला घोषित कार्यकारिणीमध्ये झाली या मध्ये महिला जिल्हाध्यक्षपदी उच्च शिक्षित ज्योती इंगळे यांची तर महासचिव पदी सुशीलाताई खाडे व प्रतिभाताई अंभोरे यांची निवड करण्यात आली.उपाध्यक्षपदी प्रतिभा मडामे, वंदना इंगळे संघटकपदी सिमा खंडारे, आरती पवार, संगीता आठवले, सचिव पदी किरण खडसे, त्रिशिला जाधव, सहसचिवपदी मंदा धांडे,रुपाली भगत सदस्य पदी अर्चना खडसे, शांताबाई इंगोले ,शोभा इंगोले, सुषमा भगत यांची निवड करण्यात आली.या निवड प्रक्रियेत प्रदेश महासचिव तथा निरिक्षक मा. अरुंधतीताई सिरसाठ , राज्य उपाध्यक्ष मा गजाला खान,तसेच राज्य सदस्य तथा निरीक्षक नांदेड़ किरणताई गि-हे यांनी मोलाचे कार्य केले. नवनीयुक्त कार्य करिंनीला जी. प. सौ.कल्पनाताई कैलास राऊत यानी शुभेच्छ दिल्या.