अकोला :- 26 ऑगस्ट रोजी पेट्रोलिंग करत असताना,माहिती मिळाली की पिवळ्या रंगाचा आपे गाडी क्रमांक MH 30 AB-3172 माल वाहू तीन चाकी वाहणात बाळापुर वरून अकोल्यात शासकीय अनुदानित धान्य जास्त किमतीत विक्री दरात करत आहेत अशी खात्री लायक बातमी मिळाल्या नंतर तुषार हॉटेल समोर नाकाबंदी करण्यात आली.सदर वाहन अडवून वाहनाची पाहणी केली असता,गाडीत तांदूळ गहू आढळून आले.गाडी चालकास नाव विचारले असता तर त्यांनी आपले नाव आशिष भगवान घनमोडे वय 22 वर्ष,राहणार तेलिपुरा बाळापूर असे सांगितले. 17प्लास्टिक पोत्यात तांदूळ आणि 3 गव्हाचे पोते हे धान्यं ने भरलेलं आढळले.एकूण 20 पोते धान्य चा मुद्देमाल हा एकूण एक लाख 63 हजार 472 रुपयाचा माल जप्त करण्यात आला.सदर त्याला धान्य बाबत विचारले असता, त्याने सर्व धान्य हे खेडेगावातून कमी दरात विकत घेऊन जास्त दरात विकण्यासाठी घेऊन जात आहे असे सांगितले आहे .त्यांच्या विरुद्ध अकोला पोलीस स्टेशन अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सदर ची कार्यवाही मा.पोलीस निरीक्षक सा.जी.श्रीधर अप्पर पोलीस निरीक्षक एम. राउत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नी.विलास पाटील आणि विशेष पथक अंमलदार यांनी केले.