दक्षिण सोलापूर तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामाबद्दल पुरस्कार प्राप्त केला आहे त्यांनी व सर्व ग्रामपंचायत ने आपल्या गावाचे निकड, गावातील उपलब्ध स्तोत्र याचा विचार करून माझा वॉर्ड, गाव वैभवशाली बनावे, तालुक्यात व जिल्ह्यात गावाचे वेगळी ओळख निर्माण व्हावीअशा पद्धतीचे कामकाज करावे असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी महाआवास अभियान 2.0 या उपक्रमात अंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल यामध्येउत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायती ,लाभार्थींच्या सन्मान सोहळा प्रसंगी यशवंतराव चव्हाण सभागृह आपल्या भावना व्यक्त केल्या. पुढे बोलताना गावातील साक्षरतेचे प्रमाण, उच्च शिक्षतचे प्रमाण ,व्यापारी गाळे , शेती उत्पादने यातून आर्थिक चक्र समृद्ध बनावे. सर्व शासकीय योजनांचे बारकाईने अभ्यास करून गावासाठी कशा पद्धतीने फायदा करता येईल याचा विचार ग्रामपंचायतने करणे आवश्यक आहे. ग्रामसेवकांनी रोजगार निर्मिती, शिक्षणात गावच्या विकासात अशा पद्धतीने काम करावे की ग्रामसेवकाची बदली होताना गावअश्रू ढाळावेत अशा पद्धतीचे कामकाज करणे अपेक्षित आहे. पंचायत समितीने या अनुषंगाने गावागावात स्पर्धा आयोजित करावी असेही मार्गदर्शन पंचायत समितीला केले. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत इशादीन शेलकदे यांनी नाविन्यपूर्ण योजना राबवण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावा. गावठाण क्षेत्रात जुन्या पडीक घरे याच्या ऐवजी सार्वजनिक क्षेत्रासाठी उपयुक्त अशा मत्ता करता येईल का याचाही विचार ग्रामपंचायतने करावा असे मार्गदर्शन केले .उमेशचंद्र कुलकर्णी सहाय्यक प्रकल्प संचालक यांनी आवास योजनेअंतर्गत लवकरात लवकर कामकाज पूर्ण केल्यास ही योजना अतिशय फायदेशीर व समाधानकारक ठरणारी आहे असे मार्गदर्शन या प्रसंगी केले. याप्रसंगी निंबर्गी, मंद्रूप औराद माळकवठे,भंडारकवठे, बोरामणी, ग्रामपंचायत यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले धरेपा पिराजी मोरे निम्बर्गी,महादेव मल्लप्पा घोटाळे औराद, कल्लप्पा धरप्पा रूपनुरे बंकलगी, भीमाशंकर रेवप्पा कांबळे मंद्रूप, कुंडलिक सुबराव भडकुंबे गुंजेगाव ,सिंधू अर्जुन कांबळे भंडारकवठे या लाभार्थींना तर क्लस्टर पुरस्कार हतुर गणअमर दोडमनी विस्ताराधिकारी ,भंडारकवठे गणातून बी.सी पाटील विस्ताराधिकारी यांना प्रमाणपत्र ,स्मृतिचिन्ह, रोप देऊन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांनी केले. सूत्रसंचालन सहाय्यक प्रशासन अधिकारी विवेक लिंगराजतर आभार प्रदर्शन विस्ताराधिकारी पुनम नरसोडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी निर्मला राठोड, विशाल मालतुमकर, इस्माईल मुलानी,रोहन चव्हाण, कैलास जीदे ,भीमाशंकर वाले, बाळासाहेब ममाने ,अविनाश माने, बापूसाहेब भिसे आदींनी परिश्रम घेतले.