बीड - अनिल घोरड

 गेवराईमध्ये जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित क्रिडा महोत्सवात दैठण येथे झालेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत अखेरपर्यंत झुंजत माध्यमिक विद्यालय तलवाडा येथील मुलींचा संघ विजेता ठरला तर मुलाच्या गटात शिवशारदा पब्लिक स्कूल शिवाजीनगरच्या संघाने बाजी मारली. या अंतिम स्पर्धेला व्हॉलीबॉलचे माजी राष्ट्रीय खेळाडू तथा माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित उपस्थित होते त्यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

शारदा अकॅडमीचे संचालक रणवीर पंडित यांच्या नेतृत्वाखाली जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित क्रिडा महोत्सवात दिनांक ६ रोजी तीस-या दिवशी दैठण येथील शारदा विद्यामंदिर येथे मुले आणि मुलांच्या गटात व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेतील सर्व विद्यालयाचे चौतिस संघ सहभागी झाले होते. 

दिवसभर झालेल्या साखळी सामन्यानंतर अंतीम सामना मुलींच्या गटात माध्यमिक विद्यालय तलवाडा विरुद्ध शारदा विद्या मंदिर गेवराई यांच्यात रोमांचकारी लढत झाली. तलवाडा संघाने गेलेला सामना उत्कृष्ट कामगिरी करत परत फिरवला आणि ग्रामीण भागातील या संघाने बलाढ्य गेवराईच्या संघाचा पराभव करुन विजेता ठरला‌. या संघात ज्ञानेश्वरी मोरे, प्रगती मरकड, बोबडे समृद्धी, पवार अंजली, किरकट अदिती, मराठे वैदवी, ढेरे गायत्री, शिंगणे दुर्गा, मोरे दिक्षा, राऊत शुभांगी, मस्के साक्षी, शिंगणे गंगासागर, बोराडे वृषाली यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांना क्रीडा शिक्षक पवार आणि सगळे सर, मुख्याध्यापक प्रमोद गोरकर, पर्यवेक्षक आरुण हाटकर यांचे मार्गदर्शन लाभले.

मुलाच्या गटात शिवशारदा पब्लिक स्कूल शिवाजीनगरच्या संघाने अतिशय शिस्तबद्ध खेळी आणि डावपेच टाकत माध्यमिक विद्यालय मारफळा संघाचा पराभव केला. ग्रामीण भागातून आलेल्या मारफळा गावच्या मुलांनी अखेरपर्यंत विजयासाठी धावपळ केली, पण उपविजेता पदावरच त्यांना समाधान मानावे लागले. शिवशारदाच्या संघात ॠत्विक चाळक, बालाजी गाडे, वरद तौर, कृष्णा तिवारी, सक्षम बोराडे, ओंकार गाडे यांनी उत्तम खेळ करत विजय मिळवला. त्यांना प्रशिक्षक प्रशांत सिरसट, नितीन हतागळे प्राचार्य दत्ता यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेचे पंच म्हणून अमित फुलारे, अभिषेक फुलारे, रोहित पांडे, सौरभ गायकवाड, रेवती सुतार यांनी काम पाहिले. 

अंतिम सामन्याला माजी मंत्री शिवाजीराव पंडित, सरपंच प्रताप पंडित, भारत पंडित, चंदुकाका पंडित, उपसरपंच अजय पंडित,

यांच्यासह सर्व मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक उपस्थित होते. विजयी संघाने जल्लोष करत आनंद साजरा केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सय्यद युनूस, ओम मोटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.