आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते भुमिपुजन

सोलापूर : सोलापूर शहरामधील शहर मध्य विधानसभा मतदार संघामध्ये येणाऱ्या प्रभाग क्र. 21 येथील गैबीपीर नगर येथील रस्ते अत्यंत खराब अवस्थेत होते. यामुळे पावसाळयात रस्त्यावर पाणी साचत होते. सदर रस्त्यावरून महिला, ज्येष्ठ नागरीकांना व पाल्यांना ये-जा करण्याकरीता अनेक अडचणी निर्माण होत होत्या. सदर परिसरातील नागरीकांनी आमदार प्रणिती शिंदे यांची परिसरातील शिष्ठमंडळाच्या माध्यमातून भेट घेवून या परिसरात नव्याने रस्ता करण्यासाठी मागणी केली होती. त्यास अनुसरुन आमदार प्रणिती शिंदे यांनी मुलभुत सोयी-सुविधाच्या शासन विशेष निधीमधून सन 2019-20 मध्ये सदरचे काम तात्काळ मंजूर करण्यास्तव सुचविण्यात आले होते. आमदार प्रणिती शिंदे यांनी तात्काळ सदरचे काम मंजूर करून घेतले, त्यास अनुसरून आज सदर कामाचे भुमिपूजन आमदार प्रणिती शिंदे त्यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी पराग शहा, विठ्ठल गायकवाड, आलिम शेख, बिलाल सगरी, बालेशहा बागवान, अर्जुन काका, हाजीमलंग शेख, सलीम शेख, रेहाना शेख व बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.