बेलापुर येथील  जिल्हा परिषद उर्दू शाळा या ठिकाणी गौसे आजम सेवा भावी संस्थाच्या वतीने स्वातंत्र अमृत महोत्स्व व संस्थेचे वर्धापण दिन निबंध व संगीत खुर्ची स्पर्धा घेऊन साजरा करण्यात आला आयोजित प्रतियोगिता २३ऑगष्टला घेण्यात आली व त्याचे बक्षीस वितरण शनिवार २७ऑगष्ट रोजी करण्यात आला. या निबंध स्पर्धा मधे प्रथम क्र.सय्यद फातिमा अज़हर, द्वितीय क्र. अलविरा मुस्ताक अत्तार, तृतीय क्र. पिंजारी महेतसम जावेद, याना ट्रॉफी व प्रमाणपत्र जि. प. सदस्य, शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. मोहसीन सय्यद, साहेबराव वाबळे पा., प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्तम भराटे,अक्षय नाईक,शफिक बागवान, हाजी इस्माईल शेख, ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई, दिलीप दायमा, कासम शेख, अजीज शेख, मेजर जमीर हाजी गणी सय्यद, दादासाहेब कुताळ,हाजी शोएब सर्फराज सय्यद, गौसे आजम सेवा भावी संस्था अध्यक्ष सुलतान शेख, उपध्यक्ष असीम शेख, सचिव नौशाद शेख,निशार शाह,भीम गर्जना तालुका अध्यक्ष रफीक शाह, मोहसिन ख्वाजा शेख आदी मान्यवर उपस्थित होते.