वर्धा यवतमाळ नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाच्या उत्खननातील करोडो रुपयांचा गौण खनिज कुठलीही शासकीय परवानगी न घेता खुल्या बाजारात विकल्या संदर्भात गेल्या दोन वर्षांपासून तक्रारदार पत्रकार अमोल कोमावार यांनी सतत पाठपुरावा करून संपूर्ण भ्रष्टाचाराचा सुनावणी दरम्यान खुलासा केला. परंतु आजपर्यंत कुठल्याही दोषींवर कारवाई झालेली नाही. याउलट पत्रकाराला कुठल्यातरी प्रकरणात गोवण्याचा किंवा त्याच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार चालू आहे.

सविस्तर वृत्त असे की, वर्धा यवतमाळ नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाचे काम सध्या चालू आहे.परंतु या रेल्वे प्रकल्पाच्या कामात अनेक गैर प्रकार चालू असल्याचे निदर्शनास आणून दिले गेले आहे. या रेल्वे कामाचे कंत्राटदार आर भरत रेड्डी कन्स्ट्रक्शन यांना व हर्षिता कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आले.या लोकांनी शासनाच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्याची हात मिळवणी करून अनेक गैर प्रकार करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे.या संबंधित तक्रारी तसेच घटनास्थळी जाऊन पुराव्यानिशी सर्व भोंगळ कारभार पकडून दिल्यानंतर सुद्धा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक कंत्राट दाराशी संगनमत करून प्रकरण दडपण्यासाठी तक्रारदार पत्रकार अमोल कोमावार यांचेवर प्रचंड दडपण आणले आहे. या प्रकारच्या विरोधात महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटना व नॅशनल युनियन ऑफ जोउनरलीस्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने तालिबानी भ्रष्टाचारी शासकीय अधिकार्याविरुद्ध 29 ऑगस्ट ला राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.