मालेगांव येथील पोलीस स्टेशन येथे आगामी काळात गणेश उत्सव,दसरा व दुर्गा उत्सव हे महत्त्वाचे धार्मिक सण येत आहेत तेव्हा हे सण साजरे करताना कायद्याचा भंग होणार नाही,याची सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये दि.27 रोजी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलताना सांगितले आहे पोलीस स्टेशन मधील सभागृहात शांतता समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी व प्रविण धुमाळ प्रमुख म्हणून उपस्थित होते प्रास्ताविक ठाणेदार किरण वानखेडे यांनी केले शहरातील प्रतिष्ठित नागरिक डॉ.विवेक माने,जिया अहेमद सर,संतोष तिखे,यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. मिरवणुकीत गुलाल उधळताना तो मज्जित किंवा कुणाच्याही घरावर जाणार नाही याची मंडळांनी दक्षता घ्यावी साऊंड सिस्टिमचा आवाज सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमात असावा व इतरही महत्त्वाच्या सूचना पोलिस अधीक्षक यांनी दिल्या बैठकीचे नियोजन सुधिर सोळंके यांनी केले यावेळी शांतता समितीच्या बैठकीला पत्रकार,गणेश मंडळाचे पदाधिकारी,दुर्गा उत्सव व इतरही धार्मिक मंडळाचे सदस्य,गावातील प्रतिष्ठित नागरिक,राजकीय पक्षाचे पदाधिकारी व पोलीस पाटील मोठ्या उपस्थित होते आभार प्रदर्शन ठाणेदार किरण वानखेडे यांनी केले.गणेश उत्सव 2022 माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस पाटील व गणेश मंडळांना सुचना करण्यात आले सर्व जनतेला पोळा व गणेश उत्सवाच्या "हार्दिक शुभेच्छा" देण्यात आल्या.शांतता समिती व मार्गदर्शक सूचना या कार्यक्रमांमध्ये पोलीस स्टेशनचे ठाणेदार वानखेडे साहेब,पोलीस कर्मचारी,पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावातील पोलीस पाटील,होमगार्ड जवान,तसेच गणेश मंडळाची सदस्य व पत्रकार बांधव उपस्थित होते.

Sponsored

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट - बूंदी

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |