गडचिरोलीत अतिदक्षता विभाग सुरू करा : भाई जयंत पाटील यांची विधानपरिषदेत मागणी
गडचिरोली ( 27 ऑगस्ट) : गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अत्याधुनिक अतिदक्षता विभागाचे, तत्कालीन पालकमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन होवून दोन वर्षे उलटल्यानंतरही फायर ऑडिटच्या नावाखाली बंद आहे, हे अतिदक्षता विभाग तातडीने सुरू करुन जिल्ह्यातील जनतेला सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत केली.
उल्लेखनीय की, गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात राज्यातील अत्याधुनिक अतिदक्षता विभागाची निर्मिती लाखो रुपये खर्चून करण्यात आली.त्याचे उद्घाटन तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले, मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटूनही तो सुरू होवू शकला नसल्याने शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्री वेळदा यांनी १६ जून रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतरही सदरचे अतिदक्षता विभाग जनतेसाठी सुरू होवू शकले नव्हते.ते तत्काळ सुरु करावे अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी मागणी केली.