केज :(प्रतिनिधि)केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील कुटे कुटुंबास  सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रीय भगवान सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.सत्यनारायण चौरे  यांनी दिनांक:- 14/ 8 /2022 रोजी पाटोदा येथे झालेल्या अपघातात जीवाचीवाडी येथील कुटे कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला होता. व त्यांना आर्थिक मदत  म्हणून त्यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांनी तीन हजार रुपयांची मदत केली. त्यांच्यासोबत  मा.सरपंच जीवाचीवाडी नारायण चौरे गंगाधर कुटे  सुभाषराव सारुक ईत्यादि सामजिक कार्यकर्ते उपस्थीत होते.

                    श्री.सत्यनारायण चौरे  हे जीवाचीवाडी येथील नेहमीच गोरगरिबांना मदत करतात व गोरगरिबाची सेवा करण्यात नेहमी अग्रेसर असतात याचाच एक भाग म्हणून त्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना धीर दिला व  अपघातग्रस्त कुटुंबास आर्थिक मदत केली .