शिरूर तालुक्यातील पंचायत समितीच्या १६ गणासाठी आरक्षण सोडत आज गुरुवार(दि.२०) रोजी पार पडली.
प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सोडतीमध्ये हर्ष म्हस्के (वय ६ वर्षे) याच्या हस्ते चिठ्ठीद्वारे आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी तहसीलदार रंजना उंबरहांडे, निवासी नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी आदी उपस्थित होते.
यावेळी खालील प्रमाणे पंचायत समिती गण जाहीर करण्यात आलेले गण व आरक्षण : कोरेगाव भीमा (अनुसूचित जाती), करंदी (अनुसूचित जमाती), कान्हूर मेसाई व शिक्रापूर (नागरिकांचा मागास प्रवर्ग),निमोणे व वडगाव रासाई (नागरिकाचा मागास प्रवर्ग स्त्री), टाकळी हाजी, सणसवाडी, तळेगाव ढमढेरे, न्हावरे, निमगाव म्हाळुंगी (सर्वसाधारण), कवठे येमाई, शिरूर ग्रामीण, कारेगाव, मांडवगण फराटा, रांजणगाव गणपती (सर्वसाधारण स्त्री)
या आरक्षण सोडतीसाठी महसूल सहाय्यक जगदीश खेडकर, करणसिंग जारवाल यांनी विशेष परिश्रम घेतले. शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटासाठी पुणे येथे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. जाहीर करण्यात आलेली आरक्षण सोडत पुढील प्रमाणे
१)टाकळी हाजी -कवठे यमाई गट – ओबीसी राखीव पुरुष, २)शिरूर ग्रामीण -निमोणे – अनुसूचित जमाती पुरुष, ३)कारेगांव -रांजणगाव गणपती- सर्वसाधारण पुरुष, ४)करंदी -कान्हुरमेसाई – सर्वसाधारण पुरुष, ५)सणसवाडी-कोरेगांव भीमा – सर्वसाधारण महिला, ६) तळेगाव ढमढेरे – शिक्रापुर – ओबीसी राखीव पुरुष, ७) न्हावरा -निमगांव म्हाळुंगी – सर्वसाधारण पुरुष, ८)वडगांव रासाई – मांडवगण फराटा (अनुसूचित जमाती) पुरुष