*जनार्दन कसारे खून प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी "मातंग एकता आंदोलनाच्या" वतीने औरंगाबाद जिल्हाधिकारी यांना निवेदन*

________________________

गायरान जमिनीच्या वादातून औरंगाबाद शहराजवळील पिसादेवी परिसरात मातंग समाजातील जनार्दन कसारे यांचा जातीय द्वेष भावनेतून कुऱ्हाडीचे घाव घालून भरदिवसा खून करण्यात आला असून या खुनातील काही आरोपी अद्याप फरार आहेत. म्हणून सदरील आरोपींना पाठीशी न घालता त्यांचा तात्काळ शोध घेऊन सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी व हा खटला FastTrack Court च्या माध्यमांतून चालवून पिडीत कसारे कुटुंबियांना न्याय द्यावा आदींसहित विविध मागण्यांचे लेखी निवेदन मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री मा.श्री.रमेश दादा बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबादचे उपजिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांना देण्यात आले. यांवेळी या प्रकरणात रीतसर कारवाई करुन आरोपींना कठोरातील कठोर शासन करण्यासाठी आम्ही अग्रेसर राहुत कारण कुठल्याही वादातून एखाद्या व्यक्तीला कायमचा संपून टाकणे असे कुठल्याही कायद्यात लिहले नसून जो या कायद्याचा भंग करेल किंवा कायद्याला चॅलेंज करेल त्यांना कुणीही माफ करणार नाही असा शब्द त्यांनी मातंग एकता आंदोलनाच्या शिष्टमंडळाला दिला. तर संयमी मार्गाने आम्ही निवेदन देऊन पिडीत परिवाराला शासनाच्या व प्रशासनाकडून न्याय मागत आहोत आणि जर का फरार आरोपी 30 तारखेपर्यंत गजाआड केले नाही तर *मातंग एकता आंदोलन* रस्त्यावर उतरुन राज्यभर तीव्र आणि आक्रमक आंदोलन छेडेल असा इशारा संघटनेच्या वतीने यावेळी देण्यात आला.

                     याप्रसंगी मातंग एकता आंदोलनाचे मार्गदर्शक व सल्लागार तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजु आहिरे, जिल्हाध्यक्ष संदीप मानकर, जिल्हा सचिव अशोक शिरसाठ, शहराध्यक्ष किशोर तुपे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा राजश्री साठे, जिल्हा संघटक भरत मानकर, ज्योतीताई जाधव, पत्रकार समाधान वाणी, पत्रकार उमेश नेमाडे, सुरेश चंदनशिव, विलास भालेराव, आडगांवचे उपसरपंच विलास खोतकर, कुणाल कांबळे, सचिन पाचूंदे, कचरु गायकवाड, दगडू रायटे, मातंग संघर्ष समिती पैठणचे पदाधिकारी अविनाश मिसाळ, युवा नेते नामदेव शरणागत, अंकुश मिसाळ, भगवान मिसाळ, अनिल ताकवाले आदींची उपस्थिती होती...!