तालुका कृषी अधिकारी कार्यालय,वाशिमच्या वतीने २५ ऑगस्ट रोजी आत्मा कार्यालय वाशिम येथे प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेवर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दिनेश बारापात्रे,कृषी उपसंचालक निलेश ठोंबरे,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषी संशोधन प्रकल्प वाशिमचे प्रभारी अधिकारी भारत गीते, कृषी विज्ञान केंद्र करडा येथील कीटकशास्त्रज्ञ राजेश डवरे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम कार्यालयातील तंत्र अधिकारी धनोडे,श्रीमती लंगोटे, दिलीप कंकाळ,वाशिम तालुका कृषी अधिकारी अनिल कंकाळ,कृषी अधिकारी प्रकाश कोल्हे, मंडळ कृषी अधिकारी उमेश राठोड, पी.एम.एफ एम.ई. जिल्हा समन्वयक मुठाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. ठोंबरे यांनी पंतप्रधान सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले, श्री मुठाळ यांनी या योजनेअंतर्गत विविध उद्योग व त्याकरीता प्रकल्प अहवाल कसा तयार करावा याविषयी माहिती दिली.डॉ. गीते यांनी तूर उत्पादन वाढीकरीता विविध उपाययोजनेबाबत मार्गदर्शन केले. कीड रोग व्यवस्थापन विषयी विज्ञान केंद्र करडाचे राजेश डवरे यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी ,शेतकरी उत्पादक कंपनीचे व महिला बचत गटाचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन उमेश राठोड यांनी केले. तर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे वाशिम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
जप्त मालमत्तेचा बँक मॅनेजरनेच केला अपहार; लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जप्त केलेल्या मालमत्तेवर अस्तित्वात नसलेली सुरक्षा एजन्सी नेमल्याचे दाखवून त्यांच्या...
2024 Kia Sonet इन अपडेट के साथ आज होगी लॉन्च, जानिए संभावित कीमत से लेकर माइलेज तक की डिटेल
2024 Kia Sonet Facelift को आठ मोनोटोन दो डुअल-टोन और एक मैट फिनिश पेंट शेड्स में बेचा जाएगा।...
Parliament Session 2023 Live Updates: शीतकालीन सत्र के लिए टीएमसी सांसद डेरेक ओ'ब्रायन को किया गया निलंबित
नई दिल्ली। आज संसद के शीतकालीन सत्र (Parliament Winter Session 2023) का 11वां दिन है। बीते...
વાઘોડિયા વિધાનસભા ના ધારાસભ્ય ફરી એકવાર જીભ લપસી - સાંભળો શુ બોલ્યા.
વાઘોડિયા વિધાનસભા ના ધારાસભ્ય ફરી એકવાર જીભ લપસી - સાંભળો શુ બોલ્યા.