औरंगाबाद :- दि.26 (दीपक परेराव)आनंद उत्सवात बैलपोळा सन विटखेडा वॉर्डात साजरा .बैलपोळा निमित्त विटखेडा परिसरात प्रचंड उत्साहात कोरोनाच्या प्रदीर्घ काळानंतर साजरा विटखेडा गावातील मारुती मंदिरात गावकऱ्यांनी यावर्षी प्रचंड उत्साहात बैलपोळा साजरा केला .

     बैलांना यावेळी पुरणपोळीचे नैवेद्य खाऊ घालण्यात आला तसेच बळीराज्याचे सुद्धा पूजन करण्यात आले पारंपारिक पद्धतीने महिलांनी व पुरुषांनी हा सण साजरा केला बैल जोड्याची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी मा.महापौर नंदकुमार घोडेले मा महापौर सौ अनिता नंदकुमार घोडेले ,सिद्धार्थ घोडेले, आदित्य घोडेले,नेहा घोडेले,वृषाली घोडेले, लव,कुश, रिशोना यांनी सुद्धा बैला चे पुजन करून आशीर्वाद घेतले 

यावेळी रावसाहेब गायकवाड, संजय खडके, बाबासाहेब खडके ,जयश्री इंदापुरे, विक्रम खडके, रवी जगदाळे, अनिल वाघलगावे, दीपक आगळे, उद्धव खडके,जितेंद्र घोडेले,बाळू साळवे ,गौतम सोनवणे, दीपक ढोणे,निलेश पाटील ,भगवान गायकवाड, ईश्वर जगदाळे, सचिन खडके, क्रांतीवीर जयस्वाल,राजू बनकर,सचिन आढाव, दादाराव रोकडे, संकेत शेळके,योगेश कुमावत, भरत पठाडे, सौरभ खडके, सागर जगदाळे ,मानव खडके, गौतम बनकर, इत्यादी उपस्थित होते.