मुरूम रॉयल्टी बंद!तरीही गुत्तेदार म्हणतो मी रॉयल्टी काढली.
जुनी रॉयल्टी दाखवून गुत्तेदाराने रस्त्याच्या कामात मुरूम वापरला.
माजलगाव प्रतिनिधी दि.26 शासकीय रस्त्याचे काम करण्यासाठी जुनी रॉयल्टी दाखवून तालखेड शिवारात होत असलेल्या मुरूम उत्खननावर तहसीलदार वर्षा मनाळे यांनी कार्यवाही केली. यावेळी नाव नंबर नसलेली मुरूमाच्या उत्खनन ठिकाणी आढळून आलेली जेसीबी जप्त करण्यात आली आहे.
माजलगाव महसुलात मुरूम उत्खननासाठी रॉयल्टी नसल्याने मोठ्या प्रमाणात मुरूम चोरी होत आहे.दाम दुप्पट भावाने हा मुरूम परिसरात विकला जातो. याबाबतीत सायं दैनिक सिटीजनने वृत्त प्रकाशित केले होते.या बातमीने जागृत झालेल्या तालखेड येथील ग्रामस्थांनी शिवारात होत असलेल्या अवैद्य मुरम उत्खननाची माहिती तहसीलदार वर्षा मनाळे यांना दिली होती.याची दखल घेत महसूलच्या पथकाने तालखेड शिवारातील गट नंबर 500 येथे शुक्रवार दि.26 रोजी सकाळी 11 वाजता धाड टाकली.यावेळी या ठिकाणी येथे मोठ्या प्रमाणात मुरूमाचे उत्खनन झाल्याचे दिसून आले.त्याचप्रमाणे या ठिकाणी नाव नंबर नसलेली जेसीबी आढळून आली.दरम्यान या ठिकाणी माहिती घेतली असता समजते,बाळराजे कन्ट्रक्शन एजन्सी मार्फत पुंगणी एकदारा शासकीय रस्त्याच्या कामात हा मुरूम वापरण्यात आला आहे.रॉयल्टी तर बंद मग रॉयल्टी गुत्तेदाराने काढली कशी?असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. दरम्यान जेसीबी महसूल कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतली आहे. अद्याप घटनास्थळी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू आहे.