प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत नोंदणी झालेल्या शेतकरी बांधवांनी इ – के वाय सी करण्यासाठी विशेष मोहीम दि.25 ते 31 ऑगस्ट 2022 कालावधीत राबविण्यात येत आहे ही नोंदणी बंधनकारक असून शेतकरी बांधवांनी निर्धारित कालावधीत आपली नोंद करावी असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी चा लाभ लाखो शेतकऱ्यांस होत आहे पुढील लाभाचे हप्ते मिळण्यासाठी इ – के वाय सी आवश्यक आहे ज्यांची ही नोंदणी होणार नाही त्यांना पुढील लाभ मिळणार नाही.

यासाठी शासनाकडून कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल तथा पोलीस पाटील यांना याची विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.

थेऊर मंडल कार्यालया अंतर्गत येत असलेल्या लोणी-काळभोर थेऊर कुंजीरवाडी,कोलवडी मांजरी या गावातील शेतकऱ्यांनी ही नोंदणी करून घ्यावी असे आवाहन हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले,तहसीलदार तृप्ती कोलते, मंडलाधिकारी गौरी तेलंग यांनी केले आहे.

ही मोहीम राबविण्यात विशेष कॅप आयोजित करण्यात यावा अशाही सूचना देण्यात आल्या आहेत यावरून शासनाला एकही लाभार्थी वंचित राहू नये हे अपेक्षित आहे.