शिरुर: शिरुर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने खरीप हंगाम व रब्बी हंगामात उत्पादकता वाढीसाठी पिक प्रात्यक्षिक राबविले जाते. या ही वर्षी खरीप हंगामात निर्वी गावची मुग पिक प्रात्यक्षिकाची निवड केली असुन 25 शेतकऱ्यांना पिक प्रात्यक्षिकाचा लाभ देण्यात आला आहे या प्रात्यक्षिकात बियाणे स्वतः शेतकऱ्यांनी वापरले असून उत्पादन वाढीसाठी बीज प्रक्रिया साठी किड व रोग नियंत्रणासाठी विविध निविष्टा देण्यात आल्या असुन पिक प्रात्यक्षिक लाभातील शहाजी शेळके यांनी पिक स्पर्धत सहभाग ही घेतला आहे.
कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव येथील डॉ दत्तात्रय गावडे यांनी पिक प्रात्यक्षिकास भेठ देऊन पाहणी करुन मार्गदर्शन केले आहे. तसेच कांदा रोपे टाकताना बीज प्रक्रिया करण्याबाबत ही आवाहन केले पिक प्रात्यक्षिकास तालुका कृषी अधिकारी सिध्देश ढवळे, कृषी अधिकारी सतीश केळगंद्रे, कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे, सरपंच शोभा तरटे ग्रामपंचायत सदस्य अनिल कांबळे, निलेश सोनवणे, शहाजी शेळके यांनी पिक स्पर्धत भाग घेतल्याने प्रक्षेत्रास भेटी दिल्या आहेत पिक प्रात्यक्षिकाचा लाभ घेतलेल्या लाभार्थींना कृषी सहायक जयवंत भगत यांनी मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमास विजय रोडे, माजी सरपंच सुनिता सोनवणे, विठ्ठल भगत, लतेश भगत कृषी सहायक संतोष फलके मोनिका झगडे उपस्थित होत्या