यवतमाळ : डॉ.अनिल पटेल  हे आपल्या यवतमाळातीलच नव्हे तर अवघ्या विदर्भातील वैद्यकीय क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आहे. ४२ वर्षा पासून ते करीत असलेली रुग्णसेवा थेट रुग्णापर्यंत पोहचण्याच्या त्यांच्या पद्धतीने वैशिष्टयपूर्ण ठरली आहे. डॉ.अनिल पटेल यांच्या रुग्णवाहिकेचा उद्घाटन समारंभ  यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला.  जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ ,निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकार इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत व शहरातील सर्व सुजाण गणमान्य नागरिक,सर्व संस्था,सामाजिक उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकार इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत व शहरातील सर्व सुजाण गणमान्य नागरिक,सर्व संस्था,सामाजिक संघटना यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.प्रतिनिधींच्या साक्षीने ह्या अद्यावत वाहनाच्या चाव्या डॉ पटेल दाम्पत्यांना सुपूर्द करण्यात आल्या. यासेवेसाठी संकल्प फाउंडेशन च्या वतीने शुभेच्छा देतांना संकल्प फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष प्रलय टिप्रमवार व जिल्हा सरचिटणीस वसंत शेळके उपस्थित होते.