लग्नपूर्वी काढलेले फोटो विवाहितेच्या पतीच्या मेलवर आणि व्हाट्सअपवर टाकून बदनामी केल्याप्रकरणी एका विरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी (ता.24) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजाजनगर येथील 25 वर्षीय विवाहिता शिऊर येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी गेली होती.  याच दरम्यान, तिचे याच गावातील एका युवकांशी प्रेम संबंध जुळले होते. विशेष म्हणजे दोघेही नंतर त्याच गावातील एका संस्थेत नोकरीला लागले, तेव्हाही त्यांचे प्रेम संबंध सुरू होते. या दरम्यान दोघांनी फिरायला जाऊन एकत्र फोटो पण काढले. शिवर येथील एका संस्थेत सोबत कामाला होते. दरम्यान दोघांचीही वेगवेगळ्या जीवनसाथी सोबत लग्न झाले. पीडिता पतीबरोबर पुण्याला गेली त्यानंतर ती पुन्हा माहेरी आली असताना 10 मार्च रोजी तिचे लग्न पूर्वीचे फोटो तिसऱ्याच आरोपीने पीडितेच्या पतीच्या व्हाट्सअपवर आणि मेलवर व्हायरल केले. याप्रकरणी सायबर पोलिसांनी शोध घेतला असता ते फोटो आरोपी तुषार सुकलाल साबणे याने मेलवरून फोटो पाठविल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे साबणे याच्या विरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आता हे फोटो तुषार साबणे यांच्यापर्यंत पोहोचले कसे त्याला फोटो कोणी शेअर केले होते याचा शोध पोलीस घेत आहेत.