निवडणुकीच्या काळात पक्षाचे झेंडे मोफत वाटणाऱ्या भाजपने राष्ट्राचा स्वाभिमान असलेला तिरंगा झेडा नागरिकांना विकला, असा आरोप युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव कुमारी वंदना बेन यांनी भोयगाव येथे बुधवारी आयोजित एका कार्यक्रमात केला.
फुलंब्री तालुक्यात डोंगरगाव कवाड, भोयगाव, वाघलगाव, पिंपळगाव त गांगदेव या ठिकाणी युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन कुमारी वंदना बेन यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात बेरोजगारी वाढत असल्याचा आरोप केला तसेच सर्वसामान्य जनता महागाईमुळे हैराण असून केंद्रातील भाजपचे सरकार मात्र धार्मिक तेढ वाढविण्याचे काम करत आहे, असाही आरोप केला. यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप बोरसे,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वरूण पाथ्रीकर, काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, औरंगाबादचे शहराध्यक्ष सागर नागरे, अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष इद्रीस पटेल, रामेश्वर गाडेकर, अंबादास गायके, संदीप डकले, योगेश बोडके, शिवाजी थोरात, गोरख थोरात, योगेश धोंडकर, शरद काकडे, अशोक काकडे, द्वारकादास काकडे, विक्रम काळे, योगेश बोडखे, सुभाष बोडके, शुभम थोरात, दत्तू झाल्टे, रावसाहेब गाडेकर आदींची उपस्थिती होती.