फुलंब्री तालुक्यातील जळगाव मेटे येथे पोळ्याच्या खांदामळणी निमित्त स्थानिक पाझर तलावात बैले धूण्यासाठी गेलेल्या काका पुतण्याचा गुरुवारी दुपारी तिन वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला असून पंढरीनाथ कचरू काळे (३३)व रीतेश अजिनाथ काळे (१८)असे काका पुतण्याचे नाव आहे.

सदरील घटने विषयी अधीक माहिती अशी की,पंढरीनाथ काळे हे दुपारी तीन वाजता बैल चारून खांदामळणी असल्याने धुण्यासाठी सख्खा पुतण्या रीतेश,पवन याला सोबत घेवून शेताच्या बाजुला असलेल्या पाझर तलावात गेले,यावेळी एका बैलाने पंढरीनाथ काळे यांना तलावात ओढले कासरा हातात असल्याने ते तलावात ओढल्या गेले.त्यांना वाचवण्यासाठी रितेश ने तलावात उडी घेतली,तलावात गाळ असल्याने दोघेही बुडाल्याचा अंदाज रितेश चा लहान भाऊ पवन आल्याने त्यांने आरडाओरडा केला स्थानिक शेतकऱ्यांनी दोघांचा शोध घेवुन फुलंब्री येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टर ने त्यांना मृत्यू घोषित केले, त्यानंतर सायंकाळी फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री ९ वाजता जळगाव मेटे येथील स्मशानभूमीत दोंघावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंढरीनाथ काळे यांच्या पश्चात दोन मुली,पत्नी, आई वडील, तर रितेश पश्चात आई वडील भाऊ असा परीवार असून सदरील घटनेची सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.