शांततेची परंपरा कायम राखत प्रशासनाला सहकार्य करा स.पो.नि. शेख मुस्तफा यांचे आवाहन :-डाॅ.गणेश ढवळे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजीवन पुर्वपदावर आल्यामुळे यावर्षी मोठ्याप्रमाणात उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जाणार असल्याचे सुतोवाच असुन गणेशोत्सवात सामाजिक,धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करावेत मात्र याचवेळी लिंबागणेशकरांनी शांततेची परंपरा कायम राखावी कुठलेही गालबोट लागु देऊ नये उत्सव शांततेत साजरा करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नेकनुर पोलीस स्टेशनचे स.पो. नि.शेख मुस्तफा यांनी आज दि.२५ ऑगस्ट गुरूवार रोजी लिंबागणेश येथील हनुमान मंदिरात आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नेकनुर पोलीस स्टेशनचे स.पो.नि.शेख मुस्तफा यांनी लिंबागणेश येथे शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी......उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना शेख मुस्तफा बोलत होते,गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरीता पोलीस अधिक्षक बीड यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विविध सुचना करताना जबरदस्तीने कोणाकडुनही वर्गणी मागु नये,सर्व नियम कायद्यांची माहिती देऊन सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोष्ट दिसुन आल्यास कायदा हातात न घेता पोलिसांकडे संपर्क साधावा,महिलांना सन्मानाची वागणूक द्यावी, ईतर स्वच्छतेबाबत काळजी घेतानाच ध्वनी प्रदुषणाबाबतही काळजी घ्यावी तसेच मंडळाचे ठिकाणी दाखविण्यात येणारे देखावे आक्षेपार्ह अगर सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच गणेशमंडपामुळे रहदारीस अडथळा होणार नाही,गणेश मंडळाचे ठिकाणी स्वयंसेवक नेमुन मंडळांच्या पदाधिका-यांनी त्यावर नियंत्रण ठेवावे. आदि सुचना करण्यात आल्या याचवेळी पदाधिका-यांनी मांडलेल्या समस्या संदर्भात माहिती घेऊन आवश्यक उपाययोजना बाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बैठकीत नेकनुर पोलीस स्टेशनचे सफौ. निकाळजे,पो.हे.राऊत,पोलीस नाईक मुंढे,पोलीस अंमलदार ढाकणे,ग्रामसेवक राठोड,उपसरपंच शंकर वाणी,माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ आप्पा गिरे ,माजी सरपंच बाळासाहेब मुळे, विक्की आप्पा वाणी,गणपति मंदिर विश्वस्त,चिंतामण जोशी, पुजारी श्रीकांत जोशी,जीवन मुळे,श्रीकृष्ण कानिटकर,गणेश थोरात,बाळकृष्ण थोरात ,बाळासाहेब जाधव,दादासाहेब गायकवाड,संतोष भोसले,विठ्ठल कदम,मोहन कोटुळे,विनायक मोरे,संतोष वाणी,सुरज कदम,औदुंबर नाईकवाडे,सौरभ कानिटकर,चेतन कानिटकर,गणपत दाभाडे,कचरू थोरात आदि उपस्थित होते.