तरुणांच्या रोजगार आणि जीवाशी खेळणाऱ्या जाहिरातबाज सरकारचा पायउतार करा -अँड.अनिल वासम
सोलापूर - केंद्र आणि राज्य सरकार नोकर भरती विषयी अनास्था दाखवत असल्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगारीचा दर चढत्या क्रमाने वाढत आहे.रोजगार निर्मिती नाही,उच्चशिक्षित तरुणांच्या विफलतेतून आत्महत्या होत आहेत.केवळ इव्हेंट आणि जाहिरात करून तरुणांच्या रोजगार व जीवाशी खेळणाऱ्या सरकार चा पायउतार हाच पर्याय आहे.हा संदेश घेऊन रोजगार आणि शहिदांच्या स्वप्नांतील भारत घडवण्यासाठी शहीद राजगुर यांच्या जयंती निमित्त राज्यव्यापी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य अँड.अनिल वासम यांनी सांगितले.
बुधवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI )च्या वतीने शहीद हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्यव्यापी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.त्या अनुषंगाने सोलापूर मधून संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी व संघटनेचे केंद्रीय समिती सदस्य यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर ते राजगुरूनगर बाईक रॅलीची सुरुवात सकाळी 7:30 वाजता सुरू करण्यात आली.यावेळी माकप चे राज्य समिती सदस्य कॉ.युसुफ मेजर व अशोक बल्ला हे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
यावेळी सर्व तरुणाई संघटनेचा शुभ्रध्वज घेऊन घोषणा देत बाईक रॅलीने राजगुरूनगर कडे आगेकूच केले.
यावेळी संघटनेचे जिल्हा कोशाध्यक्ष बाळासाहेब मल्ल्याळ,सहसचिव दत्ता चव्हाण, तालुका अध्यक्ष कादर शेख,तालुका सचिव विजय हरसुरे,राज्य समिती सदस्य अश्विनी मामाड्याल, प्रजा नाट्य मंडळाचे शाहीर अरुण सामल,मधुकर चिल्लळ,सनी कोंडा, भानुचंद्र म्याकल, दिनेश बडगू,नरेश गुल्लापल्ली,शाम आडम,अतुल फसाले, ऍड.भरत जाधव ,शंकर गुंगेवाले, आदींसह तरुण कार्यकर्ते सहभागी झाले.