यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील आरोग्य विभागाने असंवेदनशीलतेचा कळस गाठला असून विडुळ चे नवजात मृत्यू प्रकरण हे त्याचे ताजे उदाहरणं आहे.या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी आणि अन्य मागण्यांसाठी पुरोगामी युवा ब्रिगेड तर्फे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयावर विडुळ येथील नवजात मुलाचे नातेवाईक धर्मा हपसे यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा काढण्यात आला.तालुका आरोग्य अधिकारी यांच्या समक्ष जिल्हाधिकारी यांना विविध महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन देण्यात आले. उमरखेड तालुक्यातील कुठल्याच आरोग्य केंद्रात वा उपकेंद्रात विडुळ सारखी घटना घडू नये यासाठी आरोग्य व्यवस्था तत्पर ठेवावे,
उमरखेड चे उपजिल्हा रुग्णालय लवकरात लवकर सुरु करण्यात यावे, उपजिल्हा रुग्णालयात ब्लड बँक सुरु करण्यात यावी उमरखेड परिसरातील व बंदिभागातील सामान्य जनतेस मोफत,दर्जेदार व तात्काळ आरोग्य सेवा देण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन पुरोगामी युवा ब्रिगेड तर्फे देण्यात आले.
,