यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्याअंतर्गत सूरू  असलेल्या अवैद्य दोन  गावठी दारू अड्यावर पोलिसांनी छापा मारला. यामध्ये दोघांना ताब्यात घेण्यात आले असून एक लाखांचा मुदे्माल जप्त करण्यात आला. ही कारवाई खरोला शेतशिवारात 23 ऑगष्ट रोजी करण्यात आली.मुकेश रामपाल उंबरे (35) व रामू शामराव ठाकरे ( 45)  असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे. ग्रामीण पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीण येथील ठाणेदार  किशोर जुनघरे यांना प्राप्त गुप्त माहितीवरून ग्राम खरोला येथील शेत शिवारात पोलिसांनी साध्या वेषात जंगलात असलेल्या हातभट्टीवर ही कारवाई केली. सदर कारवाई दोन वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. खरोळा येथील अवैधरित्या मोहामास सडव्याची हातभट्टी सुरू करून त्यातून गावरान हातभट्टी चालवून दारूचे गाळप करताना आढळल्याने दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले. तसेच एकूण 60 पिप मोहामास सडवा 80 लिटर गावरान हातभट्टीची दारू व इतर साहित्य पोलिसांनी नष्ट केली.सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, एसडीपीओ संपतराव भोसले यांचे मार्गदर्शनात पीआय किशोर जुनघरे, पीएसआय अमोल ढोकणे,ज्ञानेश्वर मातकर, संदीप मेहत्रे, सचिन तंबाके, सचिन पदकमवार चालक पोशि अविनाश वाघाडे यांनी केली.