आळंदी : खेड तालुक्याचे सुपुत्र क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरि राजगुरु यांच्या ११४ व्या जयंती निमित्त आळंदी येथील श्रीमती लक्ष्मीबाई दुराफे विद्यालयात शालेय मुले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्थानिक नागरिकांचे वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपमुख्याध्यापक तात्यासाहेब गावडे यांचे हस्ते क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरि राजगुरु यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी क्रीडा शिक्षक अतुल पवार, जेष्ठ शिक्षिका जे.एस.वाघमारे, के.एन.देवकर, शिक्षकेतर कर्मचारी पोपट घाडगे, डी.एस. धुमाळे, व्हि.एन. भालेराव, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर आदींचे हस्ते पुष्पांजली अर्पण करीत उपस्थितांनी अभिवादन केले.
या प्रसंगी क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा सुखदेव यांच्या जीवन कार्याची माहिती शालेय मुलांना देण्यात आली. क्रांतिकारकांच्या जयघोषाच्या घोषणा देत मुलां मध्ये देशाभिमान जागृत करण्यात आला. वंदेमातरम गीताने हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंती निमित्त आयोजीत अभिवादन सभेची सांगता करण्यात आली.