नायगाव (आप्पासाहेब गोरे )कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरबडा दूरक्षेत्राचे पोलीस जमादार रमेश निखाते व पोहेकाॅ लक्ष्मण सोनकांबळे यांचा बिलोली गुन्हे शाखा विभागात दुसरा क्रमांक आल्यामुळे त्यांना बिलोली चे सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस अधिकारी आर्चीत चांडक यांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे हा गौरव कमी वेळामध्ये उत्कृष्ट तपास करून गुन्हे निकाली काढल्याबद्दल झाला आहे. उत्कृष्ट कार्य व तपास यंत्रणा आणि त्यांच्या काम करण्याच्या पद्धती बद्दल बिलोली विभागात दुसऱ्या क्रमांकावर आल्यामुळे हा सन्मान करण्यात आला आहे .काही अवधीतच त्यांना वरच्या पदावर प्रमोशन मिळणार असल्याची माहिती हत्ती आली आहे. त्यांचा सेवानिवृत्तीचा काळ जवळ आल्यामुळे ते धाडसी कारवाई करीत असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या या कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.