परसुल उर्धुळ शिवारात घराची भिंत पाडली त्यामध्ये 48 वर्ष इसमास मुक्का मार लागून जखमी मात्र पंचनामा करण्यास संबंधित अधिकारी करिता टाळाटाळ

चांदवड तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून सततधार पावसाने जागोजागी घरे पडले असुन. 

त्याच अनुशंगाने परसुल उर्धुळ शिवारातील साहेबराव देवराम सोनवणे, यांच्या घराची भिंत हि दि 12ऑगस्ट 2022रोजी पडली असून, त्या ठिकाणी साहेबराव देवराम सोनवणे वय वर्ष 48यांच्या आंगावर पडली आसता, त्यात त्याच्या पायाला व माडीला मुक्का किरकोळ मार गेल्याचे सुत्रांकडून समजते. 

यावर शासकीय अधिकारी तलाठी, ग्रामसेवक, त्याप्रमाणे गावातील सरपंच उप सरपंच सदस्य याना देखील वेळोवेळी सागुन आज येतो उद्या येतो असे उडवायची उतर देत आहे. 

व त्यामुळे आमच्या गरिबांचे कोणीच ऐकण्यास तयार नसल्यामुळे. 

शेवटी प्रसार माध्यमाशी संर्पक साधुन आम्ही झालेल्या घटनेची हाकीगत सागत आहे. 

यावेळी साहेबराव देवराम सोनवणे व त्याची पत्नी विमल सोनवणे यांनी आधिक माहिती दिली.