केज (प्रतिनिधी) विहिरीत पडून दोघा बाप लेकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील एकुरगा येथे घडली.
एकुरगा येथील जि प शाळेत चौथीच्या वर्गात शिकत असलेला सोनू उर्फ रोहन नटराज धस वय तेरा वर्ष हा शाळा सुटल्यानंतर 22 ऑगस्ट रोजी आपल्या वडिल नटराज रामहरी धस यांच्यासोबत धस माळावर असलेल्या शेतात गेला. या ठिकाणी राजाभाऊ धस यांच्या शेतातील विहिरीत पाणी पिण्यासाठी उतरला असता सोनू उर्फ रोहन पाय घसरून पाण्यात पडला. हे पाहताच वडील नटराज धस यांनी त्याला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली. मात्र रोहन याने वडिलांच्या गळ्याला मिठी मारली. त्यामुळे दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोघेही बापलेक रात्री घरी परतले नाहीत म्हणून नातेवाईकांनी शोधा शोध केली. शेतात जाऊन पाहिले असता विहिरीच्या कडेला चप्पल विहिरीत चॉकलेटचे कागद आढळून आली यावरून दोघेही विहिरीत पडले असल्याचा अंदाज आला. ग्रामस्थांनी विहिरीत शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर मुरुड येथून एका व्यक्तीला बोलावून घेत त्याच्यामध्ये तिने गळ टाकून दोघांचे प्रेत वर काढण्यात आली. उपस्थित महिलांनी व नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी नांदूर घाट पोलीस चौकी चे मेसे रशीद शेख यांना घटनास्थळी पाठवले उत्तरे तपासणीसाठी शव नांदूर घाट ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे