मालेगांव शहरातील तहासिल रोड आठवडी बाजार स्थित असलेल्या स्मशान भूमी मध्ये नगरपंचायतीच्या घंटागाड्या उभ्या केल्या जातात त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने घंटागाडीच्या पार्किंगची जागा बदलून शहरातील अन्य ठिकाणी हलविण्यात यावी अशी मागणी नागरीका मधुन होत आहे नगरपंचायतीच्या घंटागाड्या शहरातील घनकचरा संकलन केल्यानंतर आठवडी बाजारात असलेल्या हिंदू स्मशानभूमीत लावण्यात येतात घनकचरा गोळा करणाऱ्या घंटा गाड्यांची दुर्गंधीमुळे मोक्षधाममध्ये येणाऱ्यांना नाकाला रुमाल लावून बसावे लागते तर बाकावर बसण्यास देखील अडचणी येतात या शिवाय शहरातील घनकचरा तसेच मृत झालेली जनावरे सुध्दा मोक्षधाम लगतच्या संरक्षण भिंतीजवळ टाकली जातात नगरपंचायत प्रशासनाच्या गलथन कारभाराबाबत मालेगावकरांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे नगरपंचायत प्रशासनाने मोक्षधाम मधील घंटागाडी पार्कींगची जागा बदलन्यात यावी अशी मागानी शहरातील सर्वच नागरीकातुन होतआहे.